
जातीवाचक शिविगाळ करणाऱ्याला जामीन नाकारला
रत्नागिरी : हातखंबा येथे स्टॉपजवळ जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणातील संशयिताचा अटकपूर्व जामिन अर्ज न्यायालयाने मंगळवारी नाकारला.
विलास रमाकांत बोंबले (41,रा. हातखंबा,रत्नागिरी) असे जामिन अर्ज नाकारलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात मिलिंद कदम यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानुसार, 27 जून 2022 रोजी सायंकाळी मिलिंद कदम, पर्शुराम मारुती कदम, प्रभाकर मारुती कदम (सर्व रा. हातखंबा) हे कारने हातखंबा ते रत्नागिरी असे येत होते. त्यावेळी हातखंबा बसस्टॉपजवळ ते आले असता विलास बोंबलेने त्यांना जातीवाचक शिविगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान आपल्याला अटक होण्याच्या शक्यतेने विलासने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु अतिरिक्त सत्र न्या. एल.डी.बीले यांनी त्याचा जामिन अर्ज फेटाळून लावला.