
आंबा घाटात सीएनजीची वाहतूक करणारा कंटेनर कोसळला
रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर वारंवार अपघात होत आहे. ट्रक, कंटेनर, कार दरीत कोसळल्याच्या यापूर्वीही घटना घडल्या आहेत. काल गुरुवारीही आंबा घाटातील दख्खन येथे ५० फूट खोल दरीत कंटेनर कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातात चालक आणि क्लिनर असे दोघेही जखमी झाले आहेत.
हा कंटेनर कोल्हापूर हुन रत्नागिरीच्या दिशेने येत होता. दख्खन येथे आल्यावर चालकाचे कंटेनर वरील नियंत्रण सुटले. यातच तो ५० फूट खोल दरीत कोसळला. कंटेनर मध्ये असलेल्या बाटल्यांमध्ये सीएनजी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलिस घटनास्थळी दाखल झाले.