मुंबई-गोवा महामार्गावरील भरणेनजिक उभ्या ट्रकला टँकरची धडक
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथे उभ्या असलेल्या ट्रकला टँकरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात टँकरचालक जखमी झाला. जखमी टँकरचालकाचे नाव समजू शकले नाही. भरणे येथील उड्डाण पुलाच्या अलिकडील रस्त्यावर गोव्याच्या दिशेने जाणारा ट्रक रस्त्याच्या बाजूला थांबला होता. याचदरम्यान मुंबईहून गोव्याकडे जाणार्या रसायन वाहतुकीच्या टँकरने धडक दिली. अपघातातील जखमी टँकरचालकास उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. यात टँकरच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. www.konkantoday.com