
भोस्तेनजीक रेल्वेतून पडून ओरिसातील तरुणाचा मृत्यू
कोकण रेल्वे मार्गावरील खेड भोस्ते-विराचीवाडी रेल्वे खळानजीक रेल्वेतून पडून तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. उमाकांता माझी (२५, घासडुमर-ओरिसा) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाडीतून प्रवास करताना तोल जावून खाली पडला. गंभीर जख झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह हेल्वेरुळावर गस्त घालणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीस पडल्यानंतर पोलिसात खबर देण्यात आली.
www.konkantoday.com