
रेल्वे मंत्रालयाने लोअर बर्थच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला.
रेल्वे मंत्रालयाने लोअर बर्थच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे ही सुविधा ठराविक प्रवाशांनाच मिळणार आहे. नेमका काय आहे हा नवीन नियम, याची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली आहे. प्रवासादरम्यान लोअर बर्थवर बसणे आणि झोपणे सोयीचे मानले जाते, म्हणूनच अनेक प्रवासी यासाठी आग्रह धरतात. मात्र आता रेल्वे प्रशासनाने ठराविक गटासाठी हे आसन राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मंत्री वैष्णव यांच्या मते, वयोवृद्ध नागरिक, महिलांना आणि दिव्यांग प्रवाशांना लोअर बर्थ प्राधान्याने दिला जाईल. या प्रवाशांना जास्तीत जास्त सोय होईल, यासाठी हे आसन त्यांच्या नावावर राखीव ठेवण्यात येणार आहे.मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केलेल्या नव्या नियमानुसार, ट्रेनमधील लोअर बर्थ आता ठराविक प्रवाशांच्या गटासाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासात अशा प्रवाशांना होणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.