कोकण मार्गावून धावणार्या जबलपूर-कोईमतूर साप्ताहिक ट्रेनला मुदतवाढ
कोकण मार्गावून धावणार्या जबलपूर-कोईमतूर साप्ताहिक स्पेशलला मुदतवाढ देण्याचा निर्णय पश्चिम मध्य रेल्वे प्रशासानाने घेतला आहे. त्यानुसार २९ सप्टेंबरपर्यंत धावणारी जबलपूर-कोईमतूर सुपरफास्ट साप्ताहिक स्पेशल ६ ऑक्टोबरपर्यंत धावणार आहे. ऐन गणेशोत्सवात स्पेशलला देण्यात आलेल्या मुदतवाढीमुळे चाकरमान्यांची चांगली सोय होणार आहे. ०२१९८/०२१९७ क्रमांकाची जबलपूर-कोईमतूर साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ६ ऑक्टोबरपर्यंत दर शुक्रवारी व परतीच्या प्रवासात दर सोमवारी धावणार आहे. सुपरफास्ट साप्ताहिक स्पेशलला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत असल्यामुळे मुदतवाढ देण्यात आली आहे.
www.konkantoday.com