लांजा तालुक्यातील जावडे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या किचन मध्ये शिरला नागोबा


लांजा तालुक्यातील जावडे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या किचन मध्ये नागोबा शिवलेले खळबळ उडाली मात्र सर्पमित्रानी या नागोबाला ताब्यात घेतले
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा जावडे नंबर १ च्या किचन शेडमध्ये हा नाग जातीचा अस्सल विषारी साप घुसला होता. पूर्ण वाढ झालेला आणि पाच फूट लांबीचा असा हा नाग होता. या शाळेतील शिक्षकांना हा साप दृष्टीस पडला. त्यानंतर शाळेचे शिक्षक रामचंद्र मापनकर यांनी तात्काळ लांजा येथील सर्पमित्र सचिन जाधव यांना फोन करून याबाबची माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र सचिन जाधव आणि विठ्ठल गोगुलवार हे शाळेत दाखल झाले. त्यानंतर या विषारी नाग जातीच्या सापाला पकडण्यात आले. यासाठी शाळेचे शिक्षक रामदास कदम, सौ. मांडवकर यांचे देखील सहकार्य लाभले.मात्र विद्यार्थ्यांच्या सुदैवाने तो साप शिक्षकांच्या नजरेत आला आणि पुढील प्रकार टळला. मात्र या अस्सल नाग जातीच्या सापाला पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या घबराट झाली मात्र सर्पमित्राने हा साप पकडल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button