
खेड तालुक्यातील भरणेत सर्व्हिस रोडवरून धावताहेत अवजड वाहने
खेड तालुक्यातील भरणे येथील सर्व्हिस रोडवून अवजड वाहतुकीची वाहने धावत असल्याने वाहनचालकांसह पादचार्यांचा जीव टांगणीला लागला आहे. मात्र पोलीस यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे अवजड वाहतुकीच्या वाहनचालकांचे फावत आहे.भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणी नानाविध समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. यात ठिकठिकाणी साचणार्या पावसाच्या पाण्याची भर पडली असून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. या पाठोपाठ आता सर्व्हिस रोडवरून धावणार्या अवजड वाहतुकीच्या वाहनांची भर पडली आहे.www.konkantoday.com