नागपुरात चक्क तीन हजार नारळांचा वापर करून बनवली तब्बल 12 फूट उंच श्री गणेशाची मूर्ती
गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. कित्येक ठिकाणी पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्याचा प्रयत्न लोक करताना दिसत आहेत. नागपुरातील अशाच एका अनोख्या गणेश मूर्तीची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.याला कारण म्हणजे, ही मूर्ती चक्क तीन हजार नारळांचा वापर करून बनवली आहे.
ही मूर्ती तब्बल 12 फूट उंच आणि 10 फूट लांब आहे. परळी वैजनाथ मंदिर ट्रस्टकडून ही मूर्ती बनवण्यात आली आहे. ही मूर्ती बनवण्यासाठी 20 दिवस लागले. यासाठी मूर्तिकारांना 24 तास काम करावं लागलंही मूर्ती बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या नारळांचा वापर करण्यात आला. काही ठिकाणी मोठे, तर काही ठिकाणी छोटे नारळ वापरले आहेत. काही ठिकाणी नारळाच्या कवटींचा वापर केला जातो. विशेष म्हणजे, या मूर्तीचे डोळेदेखील नारळापासून तयार केले आहेत.ही मूर्ती बनवण्यासाठी भारतातील प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिरात अर्पण केलेल्या नारळांचा देखील वापर करण्यात आला आहे. पर्यावरणाचा विचार करून ही इको-फ्रेंडली मूर्ती तयार करण्यात आली आहे. ही मूर्ती तयार केल्यानंतर परळीला रवाना करण्यात आली आहे.
नागपूरचं चितारोळी मार्केट हे गणेश मूर्ती बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. या मार्केटमध्ये तयार करण्यात आलेल्या गणेश मूर्ती केवळ देशातच नाही, तर विदेशातही जातात. या बाजारात 5 इंचाच्या गणेश मूर्तीपासून तब्बल 21 फुटांची मूर्ती देखील तयार होते.
www.konkantoday.com