दापोलीत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यास नगर पंचायत प्रशासनाला अपयश
दापोली शहरात भटक्या कुत्र्यांचा सगळीकडेच वावर वाढला आहे. शहरात वावर वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या वावराचा बंदोबस्त करण्यास नगर पंचायत प्रशासनाला अपयश आले आहे. नागरिकांना लहान-मोठ्या कामांसाठी शहरात जावे लागते पण कुत्र्यांच्या वावराने नागरिक त्रस्त झाले आहेत.दापोली शहरातील मुख्य मार्गावर भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. शिवाय शहरातील नगर पंचायतीचे प्रशासकिय कार्यालय असलेल्या ईमारती समोरील रस्त्यावर विविध ठिकाणच्या शहरातील रस्त्यावर मोठया प्रमाणात कुत्र्यांचा वावर वाढला आहे. रस्तोरस्ती ठाण मांडून बसलेल्या कुत्र्यांची टोळधाड अचानकपणे दुचाकीवरून जाणा-यांच्या भुंकत मागे लागते, ही कुत्र्यांची टोळधाड पादचा-याचीही पाठ सोडत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
www.konkantoday.com