
चिपळुणात दोन गटात राडा, एकावर तलवारीने वार
किरकोळ कारणावरून दोन गटात राडा झाल्याची घटना चिपळूण तालुक्यातील मिरजोळी येथे बुधवारी रात्री ९.३० वा. घडली. यात एकावर तलवारीने वार करण्यात आला असून हातोड्याने डोक्यात गंभीर जखम करण्यात आली. त्याची प्रकृती गंभीर आहे. अन्य एकजण जखमी झाला आहे. या प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी देण्यात आल्या असून २० हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनेनंतर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी गुरूवारी येथे भेट घेवून माहिती घेतली.
साद पेवेकर व कैफ पेवेकर हे दोघे बुधवारी रात्री मिरजोळी येथील मंगेश पवार यांच्या टपरीवर चेष्टा मस्करीत शिवीगाळ करीत होते. यावेळी येथे असलेल्या साजिद बशीर बेबल (३६, शिरळ) याने माझ्याकडे बघून आवाज का वाढवताय, असे विचारून कैफ याच्या कानाखाली मारले. त्यामुळे कैफ व साद यांनी आपल्या नातेवाईक व मित्रांना बोलावून घेतले. यामुळे दोन गटात येथे तुफान राडा झाला. यावेळी अज्ञाताने साद यांचे वडील शकील पेवेकर यांच्या डोक्यात हातोडा मारून हातावर तलवारीने वार केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. त्यामुळे शकील यांची प्रकृती गंभीर बनली असून त्यांच्यासह अमित मोरे हा जखमी झाला. सध्या त्यांच्यावर एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
www.konkantoday.com