कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सावंतवाडी दिवा पॅसेंजरला आज १५ सप्टेंबरपासून दोन एसी डबे
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सावंतवाडी दिवा पॅसेंजरला येत्या १५ सप्टेंबरपासून सामान्यांना परवडतील, असे इकॉनोमिक श्रेणीतील थ्री टायरचे दोन एसी डबे जोडले जाणार आहेत.ही गाडी पूर्वीप्रमाणेच १६ डब्यांची असून गाडीच्या डब्यांच्या संख्येत कोणताही बदल झालेला नाही. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने एसी प्रवासाची प्रवासी जनतेला भेट दिली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मडगाव-सावंतवाडी- दिवा एक्स्प्रेसला वातानुकूलित डबा जोडण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती. कोकण विकास समितीने यासाठी कोकण रेल्वेकडे पाठपुरावा केला होता. रेल्वेने याची दखल घेत इकॉनॉमी श्रेणीतील थ्री टायरचे दोन डबे दिनांक १५ सप्टेंबरपासून तात्पुरत्या स्वरूपात जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
कोकण रेल्वे माहितीनुसार मडगाव-सावंतवाडी (गाडी क्र. 50108) त्याच रेकसह सावंतवाडी ते दिवा (गाडी क्र. 10106) मार्गावर रोज चालवल्या जाणाऱ्या एक्स्प्रेस गाडीला १५ सप्टेंबरपासून १४ ऑक्टोबरपर्यंत महिन्याभराच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात एसी थ्री टायरचे दोन डबे जोडले जाणार आहेत. परतीच्या प्रवासात दिवा सावंतवाडी (10105), सावंतवाडी ते मडगाव (50107) ही गाडी १६ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत वातानुकूलित थ्री टायर दोन डब्यांसह धावणार आहे.
www.konkantoday.com