
आता काय करायच! ,ठाणे पोलिसांच्या वेबसाईट सह देशातल्या अनेक खासगी आणि सरकारी वेबसाईट्स हॅक
नुपूर शर्मा प्रकरणात सध्या देशातल्या अनेक खासगी आणि सरकारी वेबसाईट्स हॅक झाल्याची घटना समोर आली आहे. त्यातच आता ठाणे पोलिसांची वेबसाईटही हॅक करण्यात आली आहे. या आंतरराष्ट्रीय सायबर हल्ल्याची आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही पुष्टी केली आहे.पत्रकार परिषदेत बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी याविषयीची माहिती दिली आहे. वळसे पाटील म्हणाले की, गेल्या २ दिवसात देशात अनेक वेबसाईट हॅक झाल्यात. आपले सायबर प्रमुख याबाबद्दल तपासणी करत आहेत. ठाणे पोलिसांची वेबसाईट देखील हॅक झालीये. राज्य सरकारने याचा आढावा घेतलाय. यावर काय उपाययोजना करायच्या यावर यंत्रणा काम करत आहेत.
www.konkantoday.com