विनयभंग प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता
राजापूर: अल्पवयीन बालिकेचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मनोज मधुकर राऊत (राह. ससाळे, राजापूर) याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणातील पीडित मुलगी इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असताना मनोज मधुकर राऊत याने पीडित मुलीचा छुपा पाठलाग करून वेळोवेळी विनयभंग केल्याने त्याच्याविरोधात राजापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची न्यायालयात सुनावनी होवून सरकारी पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. या ९ साक्षीदारांनी सरकार पक्षाच्या वतीने साक्षी दिलेल्या होत्या. विशेष न्यायालयाने अपुऱ्या पुराव्याच्या आधारे आरोपी मनोज राऊत याची निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीच्या वतीने अॅड मिलींद चव्हाण यांनी काम पाहिले.
www.konkantoday.com