
रत्नागिरी धामणसे-नेवरे ते मालगुंड व गणपतीपुळे आरेवारे रत्नागिरी या एसटी बस फेऱ्या चालू करण्याची मनसेची मागणी
रत्नागिरी धामणसे-नेवरे ते मालगुंड व गणपतीपुळे आरेवारे रत्नागिरी या एसटी बस फेऱ्या तात्काळ चालू करण्यात याव्यात यासंदर्भात मनसे तालुकाध्यक्ष श्री.रूपेश जाधव यांच्या नेतृत्वात आज विभाग नियंत्रक श्री.प्रद्नेश बोरसे यांना निवेदन देण्यात आले..सदरहू मागणीचा अनुषंगाने तातडीने कारवाई करण्यात येईल असे आश्वासन एस टी प्रशासनाकडून देण्यात आले.
यावेळी विभाग नियंत्रक श्री. प्रद्नेश बोरसे व एसटी अधिकाऱ्यांना मनसेकडून निवेदन देण्यात आले.याप्रसंगी मनसे तालुकाध्यक्ष श्री.रूपेश जाधव , तालुका उपाध्यक्ष श्री. राजू पाचकुडे, विभागअध्यक्ष श्री. संकेत गवाणकर , सचिन सांडीम, सौरभ पाटील , श्री. अखिल शाहू , श्री. सोम पिलणकर, सौ. आकांक्षा पाचकुडे, आशिर्वाद सुर्वे, अभिपेक गवणकर आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com