रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील मदरशातील १७ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार


रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील मदरशातील १७ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शनिवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी मदरशाचे मुख्याध्यापक ईब्जी ( रा. पावस काझीवाडा) यांनी पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही पावस काझी मोहल्ला येथील मदरशात शिक्षण घेत होती. काही दिवसांपूर्वी तिने वडिलांना आपल्याला मदरशात रहावयाचे नाही असे सांगितले होते. दरम्यान ९ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास अचानक मदशातून बेपत्ता झाली. तिच्या वडिलांकडे व नातेवाईकांकडे तिच्याबाबत चौकशी केली असता तिचा थांगपत्ता लागला नाही.
त्या मुलीबाबत मदशातील अन्य मुलींशी चर्चा केली असता ती मागील काही महिन्यांपासून रेहमान शेख (रा. भिवंडी ठाणे) या तरुणाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार रेहमान शेख याने त्या मुलीला फूस लावून पळवून नेले अशी तक्रार मदरशाचे मुख्याध्यापक यांनी पूर्णगड पोलिसांत दाखल केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button