महिलांना आजही अन्याय, अत्याचाराला बळी पडावे लागत आहे.-राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर


चंद्रावर यान पोहोचलं, देशाची खूप प्रगती झाली, तरीही महिलांवरील अन्याय, अत्याचार कमी झालेले नाहीत. आपण कितीही महिला सबलीकरण, सक्षमीकरणाच्या गप्पा मारत असलो तरी महिलांना आजही अन्याय, अत्याचाराला बळी पडावे लागत आहे.देशातील हे चित्र बदलण्यासाठी महिलांनीच यापुढे सक्षम होणे गरजेचे आहे, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केले.

दापोलीतील रसिक रंजन सभागृहात राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे मंगळागौर कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या कार्यक्रमाला रूपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती हाेती. राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष साधना बोत्रे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

चाकणकर म्हणाल्या, देश कितीही प्रगतीकडे वाटचाल करत असला तरी महिलांवरील अन्याय, अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. हुंड्याच्या नावाने मुलींचा बाजार मांडला जात आहे. समाजातील अनिष्ठ, रूढी, परंपरा यामध्ये महिला भरडल्या जात आहेत. आधुनिक युगात वावरताना महिलांनी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या भोवती फेरे मारण्याऐवजी, वास्तवतेचे भान ठेवायला हवे. मंगळागौरच्या माध्यमातून ‘छेडछाडमुक्त मंगळागौर’, ‘बालविवाहमुक्त मंगळागौर’, ‘महिलांवरील अन्याय, अत्याचार, बालविवाह, हुंडामुक्त मंगळागौर’ असा संकल्प करूया, असे त्या म्हणाल्या.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button