
दापोली, मंडणगड , खेड विधानसभा मतदार संघ हा शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा मतदारसंघ-आमदार योगेश कदम
दापोली, मंडणगड , खेड विधानसभा मतदार संघ हा शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा मतदारसंघ आहे.शिवसेनेचे संघटन ग्रामीण भागात मजबूत करून स्व,बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील आदर्शवत मतदारसंघ तयार करणार असून पक्ष विरहित कामे करून मतदार संघाचा व मतदार संघातील जनतेचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे उद्दिष्ट असून त्यासाठी आपण सर्वांनी हातात हात घालून काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन दापोली, मंडणगड, खेड विधानसभा मतदार संघाचे शिवसेना- शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी केले.शिवसेनेच्या वतीने मंडणगड येथील शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत आमदार कदम बोलत होते. या कार्यकर्त्यांच्या आढावा मेळाव्यास मंडणगड तालुक्यातून उत्स्फुर्द प्रतिसाद मिळाला.
यावेळी बोलताना आमदार कदम म्हणाले कि,शिवसेना संघटना म्हणजे बाळासाहेबांचे विचार आहेत. हे विचार तळागाळातील नागरिकांपर्यंत पोचवण्याचे काम आपण स्वतः करणार असून शिवसेना संघटना स्थापन झाल्यापासून प्रत्येक शाखेत गावाची बैठक , व जनसंपर्क हि पद्धत स्व. बाळासाहेब ठाकरे यांची होती.मध्यंतरीच्या कालावधीत हि पद्धत बंद झाली आहे. मात्र ती पुन्हा नव्याने सुरु करून जनतेचा विकास व पक्ष संघटन मजबूत करण्याचे आपले उद्दिष्ठ आहे.त्याकरिता प्रत्येकाने जबाबदारीने हे काम करायचे आहे.याकरिता मी स्वतः वैयक्तिक लक्ष देवून मतदार संघातील गावनिहाय कामांचा व पक्ष वाढीचा आढाव घेणार असून कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना आमदार कदम यांनी दिल्या.
www.konkantoday.com