
तुमच्यासाठी ही बातमी आहेअसे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणपत्रकारांना कुणाबाबत बोलले
मुंबई गोवा हायवे आणि दौऱ्यासाठी बांधकाम मंत्री नुकतेच रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी
तुमच्यासाठी ही बातमी आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हसत हसतच प्रसारमाध्यमांना सांगितले. त्यामुळे पत्रकारांची ही उत्सुकताच ताणली गेली बांधकाम मंत्र्यांच्या गाडीत शिवसेना नेते आणि प्रसिद्ध उद्योजक किरण सामंत बसले होते मंत्री चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाची नुकतीच पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत गाडीमध्ये किरण सामंत हेही उपस्थित होते. शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून किरण सामंत राजकारणात अधिक सक्रिय झाले आहेत. याआधीही ते सक्रिय होते. मात्र तेव्हा ते पडद्याआड राहणेच पसंत करत होते. मात्र आता ते अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची सातत्याने चर्चा होत आहे. अशा स्थितीत ते चव्हाण यांच्यासोबत एकाच गाडीतून आढळल्याने राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
www.konkantoday.com