
चिपळूण नगरपालिकेत गाजलेल्या डिझेल घोटाळा प्रकरणी लवकरच गुन्हे दाखल होणार
चिपळूण नगरपालिकेत ४८ लाखांचा घोटाळा प्रकरण गाजले होते. काही वर्षांपूर्वी चिपळूण नगर पालिकेचे नगरसेवक अविनाश केळसकर यांनी हा घोटाळा उघड केला होता. चिपळूण नगर परिषदेचे वाहन विभाग प्रमुखांनी या डिझेल माध्यमातून लाखो रुपयांची अफरातफर केल्याची तक्रार त्यांनी २०१७मध्ये लाचलुचपत खात्याकडे केली होती. त्यानंतर लाचलुचपत विभागाने संबंधितांची अनेक वेळा चौकशीही केली होती. आता लाचलुचपत विभागाने तपास पूर्ण केला असून या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे .या घोटाळा प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहेत का हे लवकरच स्पष्ट होईल.
www.konkantoday.com