
चिपळूण तालुक्यातील वीर आणि नारदखेरकी येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर लाकूडतोड करणाऱ्यांवर कारवाई
चिपळूण तालुक्यातील वीर आणि नारदखेरकी येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर लाकूडतोड केल्याचा प्रकार वनविभागाने उघड केला असून दोन्ही ठिकाणचे तोडलेले लाकूड वनविभागाने जप्त केले आहे अनधिकृत बेकायदा वृक्षतोड रोखण्यासाठी वनविभागाने केलेल्या आवाहनाच्या अनुषंगाने वनविभागाला माहिती मिळाली होती. त्यानुसार चिपळूण तालुक्यातील वीर येथील महादेव हरी विरकर यांच्या मालकी क्षेत्रातील मनाई जातीची 145 आणि बिगर मनाई जातीचे 253 झाड विनापरवाना तोड केल्याचा आढळलं होतं. हा लाकूड साठा वनविभागाने जप्त केलाय. तसंच तालुक्यातील नारदखेरकी येथील शिवाजी अंबाजी यादव यांच्या मालकी क्षेत्रातील मनाई जातीची 10 आणि बिगर मनाई जातीची 95 झाड विनापरवाना तोडल्याचे निदर्शनास आल होतं. हा लाकूड साठा सुद्धा वनविभागाने जप्त केला आहे.
याबाबत गाव पातळीवर अवैध वृक्षतोड अथवा अवैध वाहतूक सुरू असल्यास याबाबत स्थानिक वन विभाग अधिकारी यांच्याशी तत्काळ संपर्क साधावा अथवा वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन विभागीय अधिकारी दीपक खाडे यांनी केले आहे.
www.konkantoday.com