चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात आणण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज
गणेशभक्तांना आतापासूनच गावचे वेध लागले आहेत.रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी ३१२ गणपती स्पेशल रेल्वेफेऱ्या जाहीर केल्या आहेत. यात मध्य, कोकण रेल्वेच्या २५७ गणपती स्पेशल फेऱ्यांचा समावेश आहे. पश्चिम रेल्वेच्या ५५ फेऱ्याही सोडण्यात येणार आहेत. १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत नियमितपणे धावणाऱ्या सीएसएमटी मुंबई-सावंतवाडी गणपती स्पेशलला धावण्याचा पहिला मान मिळाला आहे.
१९ सप्टेंबरला गणरायाचे आगमन होणार आहे. यासाठी गावी येणाऱ्या १ लाख १० हजार चाकरमान्यांची तिकिटे कन्फर्म झाली आहेत. हजारो गणेशभक्त अजूनही प्रतीक्षा यादीवर आहेत. कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांसह गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याने सुपरफास्ट वंदे भारत एक्स्प्रेसचा उत्तम पर्याय गणेशभक्तांसाठी उपलब्ध आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रवास महागडा असूनही १० दिवसांचे आरक्षण फुल्ल झाले असून, प्रतीक्षा यादीनेही २५०चा टप्पा पार केला आहे. १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्पेशलच्या ४० फेऱ्या धावणार आहेत. ही स्पेशल सीएसएमटी मुंबई येथून १२ सप्टेंबरला रात्री १२.२० वा. सुटून त्याच दिवशी दुपारी २.२० वा. सावंतवाडीला पोहचेल. परतीच्या प्रवासात दुपारी ३.१० वा. सावंतवाडी येथून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३५ वा. सीएसएमटी येथे पोहचेल.
www.konkantoday.com