आयुष्यमान आपल्या दारी या उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात 1 लाख 43 हजार 885 लाभार्थ्यांना कार्ड वाटप
आयुष्यमान आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आजतागायत संपुर्ण देशात 25 कोटी आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हयातही 5 लाख 5 हजार 397 पात्र लाभार्थी असून त्यापैकी 1 लाख 43 हजार 885 लाभार्थ्यांना कार्ड वाटप झाले आहे.तरी उर्वरित लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या कार्डसाठी लवकारात लवकर ई के व्हायसी प्रक्रिया पुर्ण करुन घ्यावी असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी केले आहे.आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड आशा वर्कर, खाजगी कॉमन सर्विस सेंटर वा ग्राम, पातळीवरील केंद्र चालक (आपले सरकार केंद्र ), स्वतः लाभार्थी. कार्ड काढण्यासाठी रेशन कार्ड व त्याच बरोबर १२ अंकी ऑनलाईन रेशन कार्ड नंबर, आधार कार्ड व आधार कार्डास लिंक असलेला मोबाईल नंबर, स्वतः लाभार्थी, नवीन लग्न झाल्याचे नाव, नविन जन्म झालेल्या शिशूचे नाव घालण्यासाठी अपडेट रेशन कार्ड, विवाह प्रमाणपत्र, प्रधान मंत्री लेटर, जन्म प्रमाणात्र, सरकार प्रमाणे कुटुंब यादी ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
www.konkantoday.com