
रेल्वेने चिपळुणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी चिपळूण ते रेल्वेस्थानकादरम्यान एस. टी. फेऱ्या सुरू
आता गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे रेल्वेने चिपळुणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी चिपळूण तेरेल्वेस्थानकादरम्यान एस. टी. फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे खेड मार्गावर धावणाऱ्या बसेस रेल्वे स्थानकात थांबा घेऊन पुढे धावणार आहेत. गणेशोत्सवासाठी बहुसंख्य चाकरमानी गावच्या दिशेने येत असल्याने त्याच्या त्याच्या आगाराच्यावतीने काही दिवसापूर्वीच जादा बसगाड्याचेनियोजन केले आहे. मुंबईहून रेल्वेने येणारे गणेशभक्त चिपळूण रेल्वेस्थानकात उतरल्यानंतर त्याच्या पुढील प्रवासासाठी चिपळूण आगाराच्यावतीने खेड मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेस या रेल्वे स्थानकात जाऊन पुढे नियोजित मार्गावर जाणार आहेत.
www.konkantoday.com