
राज्य नाट्य स्पर्धेसाठी १५ सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका भरण्यासाठी मुदत
रत्नागिरी : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे यावर्षी ६२ व्या महाराष्ट्र हौशी मराठी नाटय स्पर्धेचे दिनांक २० नोव्हेंबर पासून आयोजन करण्यात आलेले आहे. यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या फक्त हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका १५ सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन मागविण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त हौशी संगीत, संस्कृत, हिंदी, बालनाट्य आणि दिव्यांग इ. स्पर्धांच्या प्रवेशिका ऑक्टोबर मध्ये मागवण्यात येणार आहेत.
www.konkantoday.com