रत्नागिरी तालुक्यातील जयगड समुद्रात साई गणेश नावाची मासेमारी नौका बुडाली
मच्छीमारीला सुरुवात झाल्याने मच्छीमारीसाठी बाहेर पडलेल्या रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे समुद्रात साई गणेश नावाची मासेमारी नौका बुडाल्याची घटना काल दुपारी घडली. .बोटीवरील खलाशी आणि मासेमारी जाळी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. ही नौका जयगड येथील असल्याचे कळते बोट मासेमारी करीता जयगड समुद्रात जात असताना ही दुर्घटना घडली. यावेळी बोटीवर तीन ते चार खलाशी होते. जयगड दीपगृह येथे ही दुर्घटना घडली. बोटीवरील खलाशांनी समुद्रात उड्या टाकत स्वतःचा जीव वाचवला. बोटीवरील मासेमारी जाळी सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून बुडालेली बोट काही काळानंतर किनाऱ्यवर ओढून नेण्यात आली.
www.konkantoday.com