
डीबीजेच्या प्राचार्यपदी डॉ. माधव बापट
चिपळूण : येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. माधव बापट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच डॉ. बापट सरांनी प्राचार्यपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. मंगेश तांबे, सचिव श्री. अतुल चितळे,नियामक समिती सदस्य श्री. निलेश भुरण, प्रभारी प्राचार्य डॉक्टर संजय गवाळे उपस्थित होते.