रत्नागिरीतील कोंकण रेल्वे कर्मचाऱ्याचा उपचाराच्या दरम्याने मृत्यू


रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे एस. ॲण्ड टी डिपार्टमेंट सीपीएम-३ या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी ६.२० वाजण्याच्या सुमारास घडली. श्रीपाद शकर गुरव (५३, रा. मिरजोळे पडवेवाडी) असे मृताचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीपाद गुरव हे ११ सप्टेंबर कामावर हजर झाले होते. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास गुरव यांना अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांनी रेल्वे स्टेशन येथील डॉक्टरांकडे प्राथमिक उपचार घेतला. तसेच पुढील उपचारासाठी त्यांना रत्नागिरी येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच गुरव यांचा मृत्यू झाला. अशी नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button