मिठाईत अळ्या सापडल्याचा व्हिडिओ वायरल ,कुवारबाव येथील व्यापाराला 20 हजार रुपयांचा दंड
गणेशोत्सवासारखे सणासुदीचे दिवस आल्याने नागरिकांचा आता मिठाईकडे ओढा जास्त असतो रत्नागिरी शहरानजीक कुवारबाव येथे मातादी स्वीट कॉर्नर या मिठाईच्या दुकानातील बर्फीत अळ्या सापडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्याची दखल अन्न प्रशासन विभागाने घेऊन दुकानाची पाहणी करून या दुकानदाराला वीस हजार रुपयांचा दंड ठोठावला
यादरम्यान अळी आढळून आलेली ड्रायफ्रूट बर्फी दुकानदाराने आधीच नष्ट केल्याचे निदर्शनास आले. अन्न प्रशासनाने केलेल्या पाहणी दरम्यान दुकानदाराकडे नोंदणी प्रमाणपत्र होते. मात्र, दुकानात काम करणाऱ्या कामगारांची आरोग्य तपासणी झाली नव्हती. शिवाय कामगारांना ॲपून, कॅप देखील देण्यात आलेली नव्हती अडगळीचे साहित्य मोठ्या प्रमाणात होते. त्याचप्रमाणे काही भांडी तसेच भिंतीची ठेवण अस्वच्छ होती तर काही लोखंडाची भांडी बाहेरून गंजली होती. माशा बसू नयेत यासाठी आवश्यक असलेले फ्लाय कॅचर देखील बसवले नव्हते. धक्कादायक बाब म्हणजे ग्राहकांना विक्रीसाठी ठेवलेल्या मिठाईची
अंजीर बर्फी, मलई बर्फी यांच्या खरेदीबाबत अथवा या मिठाईची निर्मिती कधी केली याबाब कोणती माहिती दुकानदाराला नव्हती. त्यामुळे या दुकानदारावर कारवाई करण्यात आली
www.konkantoday.com