महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (महावितरण) प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत- उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांकडून होणाऱ्या वीजेच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (महावितरण) प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार संबंधित भागातील उपकेंद्रांचे प्रलंबित काम पूर्ण करणे, उपकेंद्रांची क्षमतावाढ करणे आणि नवीन उपकेंद्र मंजूर करणे ही कामेप्राधान्याने पूर्ण करावीत असे अजित पवार म्हणाले. माढा, करमाळा, अकोले, नगर, खेड, कोपरगाव, मोर्शी, कळवण, निफाड, वसमत, बारामती तालुक्यांमधील कामाचा आढावा अजित पवार यांनी घेतला, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
राज्यात सद्यस्थितीत सुधारित वितरण क्षेत्र योजनेंतर्गत (RDSS) वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरणाची कामे हाती घेण्यात येत आहेत. याअंतर्गत नवीन उपकेंद्र उभारणे, उपकेद्रांची क्षमतावाढ, नवीन उच्चदाब वाहिन्या, नवीन वितरण रोहित्रे, विद्यमान वितरण रोहित्रांची क्षमतावाढ यासारखी कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळं लोकप्रतिनिधींनी मागणी केलेली बहुतांश कामे यामधून पूर्ण करण्यात यावीत असे अजित पवार म्हणाले.
www.konkantoday.com