भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिली श्री स्वामी समर्थ सेवक प्रतिष्ठान देवरुख या विख्यात आध्यात्मिक मार्गदर्शन करणार्या संस्थेस सदिच्छा भेट.
लोकसभा प्रवास योजनेंतर्गत आज देवरुख येथील प्रसिद्ध धार्मिक संस्था श्री स्वामी समर्थ सेवक प्रतिष्ठान याठिकाणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री. अतुलजी काळसेकर यांच्यासह रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद जठारयांनी सदिच्छा भेट दिली. ही संस्था आध्यात्मिक, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून समाजातील विविध प्रवर्गांतील नागरिक अनुयायी आहेत.
स्वामी समर्थांच्या प्रेरणेने या संस्थेचे आध्यात्मिक कार्य सुरू असून गुरुजी श्री. अजितजी तेलंग या संस्थेच्या दायित्वाचे निर्वहन करतात. उच्च शिक्षित असलेले श्री. तेलंग गुरुजी आण्विक शास्त्रज्ञ (न्यूक्लियर साइंटिस्ट) आहेत. त्यांनी आत्तापर्यंत जवळपास ४० हजारांहून अधिक लोकांना रेकीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले आहे. सध्या न्यायाधीश पातळीवरील उच्चपदस्थ व्यक्तींना ते रेकीचे प्रशिक्षण देतात. संपूर्ण देशभरातून लोक दोन दिवसीय रेकी प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्यांना पाचारण करतात. “आपल्यापासून जग सुरू होते आणि आपल्यानंतर ते नष्ट होते.” हा विचार रेकीच्या माध्यमातून खर्या अर्थाने स्पष्ट होतो असे त्यांचे मत आहे.
यावेळी संस्थेचे ट्रस्टी श्री. मोडक काका, संगमेश्वर-चिपळूण विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव, श्री. अभिजीत शेट्ये, श्री. सुशांत मुळ्ये, श्री. अनिल घोसाळकर, श्री. मिथुन निकम, श्री. वैभव कदम, श्री. अमोल गायकर आदि पदाधिकारी तसेच संस्थेचे सेवाव्रती साधक उपस्थित होते.
www.konkantoday.com