
पटवर्धन लोटेत खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून१२ हजार रूपये लांबवले
खेड पटवर्धन लोटे
येथील बसथांब्यानजीकच्या दुकानात साहित्य खरेदीसाठी गेलेल्या महिलेच्या पर्समधून १२ हजार रूपये अज्ञात चोरट्याने लंपास केले. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. पटवर्धन लोटे येथील थांब्यानजीक असणाऱ्या खेडेकर यांच्या किराणामालाच्या दुकानात सदर महिला साहित्य खरेदीसाठी गेल्या होत्या. गर्दीचा फायदा उठवत चोरट्याने त्यांची पर्स लांबवली.
www.konkantoday.com




