कर्ले-आंबेशेत या गावातील सुमारे १२५ गणपतींची आगमन मिरवणूक काढण्याची प्रथा सलग ३८ व्या वर्षी जपली जाणार
संपूर्ण कोकणात कर्ले-आंबेशेत या गावातील सुमारे १२५ गणपतींची आगमन मिरवणूक काढण्याची प्रथा सलग ३८ व्या वर्षी जपली जाणार आहे. यंदा खास आकर्षण असणार आहे तो पंजाबी ढोलक भांगडा नृत्य हा कार्यक्रम असणार आहे. यासंदर्भात कर्ले येथील श्री हनुमान मंदिरात रविवारी बैठक झाली.
वैयक्तीक गणेश आगमन मिरवणूक कर्ले आंबेशेत या दोन्ही गावातील समिती सदस्यांनी सभेला हजेरी लावली. ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या वेळी गणेश चतुर्थीला (ता. १९) होणाऱ्या श्री गणेश आगमन मिरवणुकीचे आयोजन व नियोजन मिरवणुकीतील कामाची जबाबदारी प्रत्येकाला वाटून देण्यात आली. १९ सप्टेंबरला सकाळी ठिक ९.३० वाजता लक्ष्मी चौक येथून स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरू होईल. आगमन मिरवणुकीचे हे ३८ वे वर्ष आहे. मिरवणुकीत पारंपरिक ढोलताशे, गावातील महिलांचे लेझीम पथक, संगीत ऑर्केस्ट्रा, संगीत चक्री भजन, बेंजो ढोलपथकांचा समावेश आहे. या मिरवणुकीत आनंदाने, उत्साहाने दोन्ही गावातील समिती सदस्य, वाडीप्रमुख आणि तरुण मंडळी गणेशभक्तांनी बहुसंख्य गणेशमुर्तींसह वेळेवर उपस्थित राहावे, असे समितीतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com