
फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर जाहीर फडणवीसांची गृह खातं , एकनाथ शिंदेंना नगर विकास आणि अजित पवारांना अर्थ खातं , उदय सामंत यांना उद्योग
संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलले महायुती सरकारचे बहुचर्चित खातेवाटप अखेर आज (दि.२१) जाहीर झाले. गृह खाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे.तसेच ऊर्जा खात्याची जबाबदारीही त्यांच्याकडेच सोपवली गेली आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पूर्वीचेच अर्थ खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नाेव्हेंबरला मतदान तर २३ नाेव्हेंबरला मतमाेजणी झाली. निकालानंतर ५ डिसेंबरला मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी शपथ घेतली. यानंतर १५ डिसेंबरला मंत्रीमंडळाचा विस्तार झाला हाेता. अखेर आज खातेवाटप जाहीर झाले.
गृह व ऊर्जा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनगरविकास : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेअर्थ : उपमुख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक बांधकाम : शिवेंद्रराजे भोसलेमहसूल : चंद्रशेखर बावनकुळेउद्योग : उदय सामंतमाती व पाणी परीक्षण : संजय राठोडपाणीपुरवठा : गुलाबराव पाटीलसार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण : प्रकाश आबीटकरवैद्यकीयशिक्षण : हसन मुश्रीफरोजगार हमी : भरतशेठ गोगावलेअन्न व औषध प्रशासन : नरहरी झिरवळउच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कामकाज : चंद्रकांत पाटीलपर्यावरण : पंकजा मुंडेमहिला व बालविकास : आदिती तटकरे क्रीडा : दत्ता भरणेजलसंधारण : राधाकृष्ण विखे-पाटील ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)जलसंधारण( विदर्भ तापी कोकण विकास)व आपत्ती व्यवस्थापन : गिरीश महाजन मत्स व बंदरे : निलेश राणेसहकार : बाबासाहेब पाटीलसामाजिक न्याय : संजय शिरसाटकृषी : माणिकराव कोकाटेअन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण : धनंजय मुंडेमदत व पुनर्वसन : मकरंद पाटीलकामगार : आकाश फुंडकर वन : गणेश नाईकशालेय शिक्षण : दादा भुसेकौशल्य विकास, रोजगार उद्योग व संशोधन : मंगलप्रभात लोढापरिवहन: प्रताप नाईकविपणन व प्रोटोकॉल : जयकुमार रावलओबीसी विकास, दुग्ध विकास, ऊर्जा नुतनीकरण : अतुल सावे अदिवासी विकास : अशोक उईकेपर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण : शंभूराज देसाईमाहीती तंत्रज्ञान : आशिष शेलारवस्त्रोद्योग : संजय सावकारेग्रामविकास : जयकुमार गोरेराज्यमंत्रीसामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण : माधुरी मिसाळ अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय : आशिष जयस्वालसार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा : मेघना बोर्डीकर उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन : इंद्रनील नाईकगृहराज्य शहर : योगेश कदमगृहनिर्माण : पंकज भोयर