यंदा कोकणात जाण्यासाठी टोलमाफी मिळणार का?शासनाने हा निर्णय लवकर घ्यावा, अशी मागणी
मागील वर्षी शासनाने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. आता गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे. त्यामुळे पुढील तीन-चार दिवसात कोकणात जाण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू होईल.त्यामुळे यंदा कोकणात जाण्यासाठी टोलमाफी मिळणार का? याकडे लक्ष लागले आहे.
मागील वर्षी राज्य शासनाने पुण्यातून जाणाऱ्या मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग तसेच इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना ही टोल माफी देण्याचे परिपत्रक जारी केले होते. दि.19 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यामुळे येत्या शनिवार-रविवारपासून गावाकडे जाण्याचे नियोजन नागरिकांनी केले आहे.
टोलमाफीचा निर्णय झाल्यानंतर याबाबतचे पास स्थानिक पोलीस प्रशासन अथवा प्रादेशिक परिवहन यांच्याकडून घ्यावे लागतात. हे पास घेण्यासाठी नागरिकांनी ऐनवेळी धावपळ होते. तसेच एकाच वेळी गर्दी होते. यापार्श्वभूमीवर शासनाने हा निर्णय लवकर घ्यावा, अशी मागणी होत आहे.
www.konkantoday.com