पालकमंत्री ना.उदयजी सामंत आणि सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठानच्या वतीने मुंबई ते संगमेश्वरला गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना १०० बसेस मोफत


राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदयजी सामंत आणि सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठानच्या माध्यमातून गपणती सणाला येणाऱ्या चक्रमान्यांसाठी तब्बल १०० एस टी बस बुक करत ५ हजार मुबंई कराना मुबंई ते ते संगमेश्वर पर्यत मोफत आणण्याचा मानस पालकमंत्री ना.उदयजी सामंत आणि सिद्धेश ब्रीद यांनी केला आहे.यावेळी तालुक्यातील येणाऱ्या येणाऱ्या चाकरमान्यांना मोफत प्रवास करता येणार आहे.पालकमंत्री ना.उदयजी सामंत आणि सिद्धेश ब्रीद यांच्या या उपक्रमाचे मुबंई करानी कौतुक करत मानले आभार आहेत.
कोकणातील बहुसंख्यचाकरमानी हा मुंबई येथे व्यवसाय. – नोकरी निमित्त राहत असतो.गणपती सारख्या मोठ्या सणाला गावी येण्यासाठी त्यांना मोठे कष्ट घ्यावे लागतात. काही लोकांना तर वेळेवर तिकीट सुद्धा मिळत नाही. या अनुषंगाने विचार करता संगमेश्वर तालुक्यातील 5000 पेक्षा जास्त लोकांना आणण्याचे कार्य राज्याचे उद्योग मंत्री ना.उदयजी सामंत आणि सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश ब्रीद यांच्या माध्यमातून केले जात आहे. संगमेश्वर तालुक्यातील मतदार संघासाठी 100 एसटी बस बुक करण्यात आले असून 100 च्या 100 एसटी फुल झाले आहेत. यावेळेस या शंभर बस मधून 5000 पेक्षा जास्त चाकरमानी संगमेश्वर येथे सुखरूप पणे गणपती सारख्या मोठ्या सणाला येणार आहेत कोकण वासियांना सिद्धेश ब्रीद यांच्याकडून सोन्याचे दिवस दिल्याचे बोलले जात आहे.
पालकमंत्री ना.उदयजी सामंत आणि सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठानच्या वतीने मुबंई ते संगमेश्वरला गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना मोफत बस सेवेचे कौतुक गावा गावांत केले जात आहे. या कामासाठी प्रसिद्ध उद्योजक भैय्या सामंत यांनी मोठा हातभार लावला आहे.
आपल्या अतिशय कमी वयामध्ये समाजातील विविध उपक्रम राबवत समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचण्याचे काम सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठानच्या माध्यमातून सिद्धेश ब्रीद करत आहेत.लोकभीमुक कार्य करण्याचे धाडस त्यांनी केले असुन जनमानसाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी,सेवा देण्याचे काम सिद्धेश ब्रीद करत असल्यामुळे अनेकांना सिद्देश ब्रीद यांना मोठ्या पदावर बघण्याची ईच्छा अनेक लोक व्यक्त करत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button