
गणेशोत्सव काळात दाम दुप्पट भाड्या आकारणाऱ्या खाजगी वाहन चालक व ट्रॅव्हल्स कंपन्यांना सिंधुदुर्ग आरटीओ प्रशासनाचा दणका
राज्यातील खाजगी प्रवास वाहतुकीचे गणेशोत्सव काळात दाम दुप्पट भाड्या आकारणाऱ्या खाजगी वाहन चालक व ट्रॅव्हल्स कंपन्यांना आरटीओ प्रशासनाने फार मोठा दणका दिला आहे.मुंबई ते सिंधुदुर्ग असे साधे, स्लीपर, शिवशाही याचे दर जाहीर केले असून खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना यापुढे या दराच्या दीडपट मर्यादितच भाडे आकारता येणार आहे. यापेक्षा जास्त भाडे आकारल्यास प्रवाशांना उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जाहीर केलेल्या दूरध्वनी व मोबाईल नंबर वर आकारण्यात आलेल्या तिकिटाच्या फोटोसह थेट तक्रार करता येणार आहे. अशी माहिती सिंधुदुर्गचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे. गणेशोत्सव काळात आरटीओ प्रशासनाने सिंधुदुर्गवासीय चाकरमान्यांसाठी एक गोड बातमी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरण विभागाने ठरवून दिले असून मुंबई ते सावंतवाडी साधी बस 750 / शिवशाही बस 1115/ तर स्लीपर बस 1105/ असा दर निश्चित करून दिला आहे. या दरानुसार किंवा या दरापेक्षा दीडपट मर्यादितच आकारू शकतात. त्यामुळे गणेशोत्सव काळात दाम दुप्पट भाडे आकारून प्रवाशांची लूटमार करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना फार मोठी चपराक बसणार आहे. या दीडपट दरापेक्षा अधिकचे भाडे आकारल्यास सिंधुदुर्गच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दूरध्वनी तसेच मोबाईल नंबर जाहीर केले आहेत. व अधिकचे भाडे घेणाऱ्या त्यावेळेस कंपन्या व ट्रॅव्हल्स एजंटा विरोधात वाहनाच्या नंबर सह भाडे तिकिटाचा फोटो काढून खाली दिलेल्या मोबाईल नंबर वर तक्रार दाखल करता येणार आहे. दूरध्वनी क्रमांक 02362 – 229050 उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे मोबाईल नंबर 98 22 84 23 33 व वरिष्ठ लिपिक कालिदास झणझणे 98 19 270 209 या मोबाईल क्रमांकावर प्रवाशांना थेट तक्रार दाखल करता येणार आहे.
राज्यातील प्रवास करणार्या प्रवाशांकडुन मोठ्या प्रमाणात खाजगी कंत्राटी वाहनांचा वापर करण्यात येतो. अशा प्रवास करणार्या प्रवाशांकडुन खाजगी कंत्राटी वाहतुकीची ने-आण करणारे वाहतुकदारांकडुन गर्दीच्या हंगामामध्ये अवाजवी भाडेवाढ करण्यात येते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे, राज्य परिवहन प्राधिकरण ने दरपत्रक ठरवून दिले आहे. त्यात मुंबई ते सावंतवाडी तिकिट दर ( साधी) 750 रू., शिवशाही 1115 रू. व स्लिपर 1105 रू. मुंबई ते कुडाळ ( साधी) 725 रू., शिवशाही 1075 रू. व स्लिपर 1070 रू., मुंबई ते कणकवली ( साधी) 670 रू., शिवशाही 985 रू., स्पिपर 980 रू., मुंबई ते मालवण ( साधी) 730 रू. शिवशाही 1085 रू., स्लिपर 1080रू., मुंबई ते वेंगुर्ले ( साधी) 760 रू., शिवशाही 1125 व स्लिपर 1120 रू., मुंबई ते देवगड ( साधी ) 705 रू., शिवशाही 1050 रू. व स्लिपर 1040 रू., पुणे स्टेशन ते सावंतवाडी ( साधी) 585 रू., शिवशाही 870 रू., स्लिपर 807 रू., पुणे स्टेशन ते कुडाळ ( साधी) 560रू., शिवशाही 830 रू., स्लिपर 825 रू., पुणे स्टेशन ते कणकवली साधी 505 रू. शिवशाही 750 रू. व स्लिपर 745 रू., पुणे स्टेशन ते मालवण ( साधी)600 रू., शिवशाही 895 रू. स्लिपर 890 रू., पुणे स्टेशन ते वेंगुर्ले ( साधी) 595 रू., शिवशाही 880 रू, व स्लिपर 875 रू., पुणे स्टेशन ते देवगड ( साधी) 560 रू. शिवशाही 830 रू. व स्लिपर 825 रू. अशा प्रकारचे शासनाने दर निश्चित केले आहेत. शासनाने विहित केलेल्या भाडेदरापेक्षा जादा तिकीट दर आकारणी केल्यास प्रवाशांनी [email protected] या ईमेल आयडीवर तसेच उपप्रादेशिक कार्यालय सिंधुदुर्ग येथे सदर वाहनाचा नोंदणी क्रमांक व भाडे आकारणी तिकीटाच्या फोटोसह आपली तक्रार प्रवाशांनी नोंदवावी असेu आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. काळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे प्रवाशांना केले आहे.
www.konkantoday.com