एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्स्पोर्ट को- ऑपरेटिव्ह बॅंकेतील कर्मचारी पुन्हा संपावर,बाराशे कर्मचाऱ्यांचे पगार अडकले


एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्स्पोर्ट को- ऑपरेटिव्ह बॅंकेतील कर्मचारी पुन्हा संपावर गेले आहेत. ५ तारखेपासून संप सुरू झाला असून सुमारे ३० टक्के म्हणजेच बाराशे कर्मचाऱ्यांचे पगार अडकले आहेत. गणेशोत्सवाच्या तोंडावर पगार अडकल्याने हे कर्मचारी रोज बॅंक सुरू आहे का, हे पाहण्यासाठी फेऱ्या मारत आहेत. अनेकांनी विभाग नियंत्रकांकडेही संपर्क साधला आहे. संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या दोन संघटनांमधील वादामुळे वारंवार संप होऊ लागल्याने कर्मचारी वैतागले आहेत. शिवाय ठेवीदारही अडचणीत सापडले आहेत.
स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बॅंकेत नवीन सत्ताधारी आले. त्यानंतर सलग दोन महिने कर्मचारी संपावर जात आहेत. यामुळे सत्ताधाऱ्यांच्या बदललेल्या धोरणामुळे आणि दोन संघटनांमधील वादाचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होऊ लागला आहे. यासंदर्भात एसटीतील काही कर्मचाऱ्यांनी सांगितले की, गेल्या महिन्यातही आमचा पगार अडकला. तो उशिरा झाला. त्यानंतर या महिन्यातही ५ तारखेपासून कर्मचारी संपावर गेले आहेत. एसटी बॅंकेत आमची कर्ज आहेत, काही कर्मचाऱ्यांची कर्जे दुसऱ्या बॅंकेत आहेत व पगार झाल्यानंतर हप्ता तिथे भरला जातो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना हप्ता भरताना अडचणी येत आहेत. एसटी बॅंकेचीएटीएम सुविधा सुरू झाली असली तरी अजूनही अनेकांना एटीएम कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे पगार काढता आलेले नाहीत. एसटीच्या सुमारे ३० टक्के कर्मचाऱ्यांचे पगार कधी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. राज्यात एसटी बॅंकेच्या ५० शाखा आहेत. यात लिपिक, शिपाई वगैर मिळून ६०० कर्मचारी कार्यरत आहेत. रत्नागिरीमध्ये ९ कर्मचारी आहेत. काहींच्या बदल्या झाल्या आहेत. मुंबईतून शाखा व्यवस्थापक बदली होऊन हजर होणार आहेत. परंतु येथे रोखपाल नसल्याने एकटा व्यवस्थापक शाखा चालवू शकत नसल्याने पगार मिळणे कठीण झाले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button