आज सकाळी जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार


मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती ढासळत चालली असून त्यांनी सलाईन लावावे असा आग्रह गावकऱ्यांनी केला होता.त्यानंतर अखेर मनोज जरांगे पाटील यांनी सलाईन घेतले आहे. डॉक्टरांच्या पथकाने रात्री साडेबारा वाजता तपासणी करुन, जरांगे पाटील यांना सलाईन लावले. दरम्यान, आज सकाळी 10 वाजता जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत. तर दुपारी दोन वाजता ते सर्व समाजबांधवांसोबत बैठक घेऊन निर्णय घेणार आहेत.

मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळत चालली असून त्यांनी सलाईन लावावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती. त्यानंतर रात्री साडेबारा वाजता जरांगे पाटलांना सलाईन लावले आहे. माझं गाव भावनिक झालं आहे. गावातील महिला रडत आहेत, ते जरा काळजाला लागतंय. माझ्यात निर्णय घ्यायला क्षमता राहिलेच नाही. सरकारला वेळ का पाहिजे हे कळले पाहिजे. सरकारने योग्य कारण दिलं तर दोन काय चार पावले मागे यायला तयार असल्याचे पाटील म्हणाले. आरक्षण खरंच देणार का याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे असे पाटील म्हणाले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button