१८ सप्टेंबर ऐवजी १३ नोव्हेंबर रोजी स्थानिक सुट्टीसुधारित सुट्टीची अधिसूचना जाहीर
*रत्नागिरी, दि. ११ (जिमाका) : सोमवार दिनांक १८ सप्टेंबर २०२३ रोजी हरतालिका पूजनकरिता जाहीर करण्यात आलेली स्थानिक सुट्टी रद्द करण्यात येत असून सुधारित १३ नोव्हेंबर २०२३ रोजी सोमवती अमावस्यानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी याबाबतची अधिसूचना आज जाहीर केली.
या अधिसूचनेत म्हटले आहे, शासन ठराव राजनैतिक व सेवा विभागाकडील निर्णय क्र.पी.-१३/दोन बी, दिनांक १६ जानेवारी, १९५८ मधील परिच्छेद ५, दिनांक ६ ऑगस्ट, १९५८ अन्वये जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये शासनाच्या सर्व खात्यामधील कार्यालयांकरिता शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टयांव्यतिरिक्त तीन सार्वजनिक सुट्टया जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. त्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी सन २०२३ या वर्षासाठी जिल्हा महसूल हद्दीकरिता दिनांक २८ फेब्रुवारी व ८ सप्टेंबर रोजी अधिसूचना लागू करुन स्थानिक सुट्टयांचे दिवस म्हणून जाहीर करण्यात आले होते.
भाऊबीज निमित्त दिनांक १५ नोव्हेंबर २०२३ रोजीची सुट्टी शासनाने जाहीर केली असल्यामुळे दिनांक ८ सप्टेंबर २०२३ च्या अधिसूचनेव्दारे भाऊबीजनिमित्त जाहीर करण्यात आलेली स्थानिक सुट्टी, याव्दारे रद्द करण्यात येत आहे आणि दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या अधिसूचनेमधील नमूद केलेली सोमवार दिनांक १८ सप्टेंबर २०२३ हरतालिका पूजन करिता जाहीर करण्यात आलेली स्थानिक सुट्टी याव्दारे रद्द करण्यात येत असून सुधारीत १३ नोव्हेंबर २०२३ रोजी सोमवती अमावस्या निमित्त स्थानिक सुट्टी या अधिसूचनेव्दारे जाहीर करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
www.konkantoday.com