शासनाकडून प्रशासकीय खर्चात काटकसर करण्यासाठी रिक्त जागांवरबाह्ययंत्रणेच्या (आऊटसोर्सिग) माध्यमातून मनुष्यबळ घेण्याचा निर्णय
शासकीय कायमस्वरूपी नोकरीच्या आशेने राज्यातील लाखो उमेदवार स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असताना राज्य शासनाने विकासकामांना पुरेसा निधी मिळावा व प्रशासकीय खर्चात काटकसर करण्यासाठी रिक्त जागांवर बाह्ययंत्रणेच्या (आऊटसोर्सिग) माध्यमातून मनुष्यबळ घेण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी पडले आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागांतर्गत १३८ पदांच्या भरतीसाठी नऊ बाह्य सेवापुरवठादार संस्थांच्या कंत्राटदारांना मान्यता देण्याचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला.
राज्य शासनाच्या विविध विभागांत ‘अ’, ‘ब’, ‘क’ व ‘ड’ या चारही गटांच्या मिळून सरासरी तीन लाख जागा रिक्त आहेत. बाह्ययंत्रणेकडून कामे करून घेण्यासाठी नऊ सेवा पुरवठा संस्था आणि पॅनेलची नियुक्ती केली आहे. यामध्ये अतिकुशल मनुष्यबळाच्या वर्गवारीत तब्बल ७० प्रकारची विविध पदे भरली जातील. कुशल मनुष्यबळामध्ये ५०, अकुशलची १० प्रकारची पदे तर अर्धकुशल आठ प्रकारची पदे कंत्राटदार संस्थांच्या माध्यमातून भरली जाणार आहेत.
www.konkantoday.com