
ज्या अधिकाऱ्याने माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले, त्या अधिकाऱ्याला स्वस्थ बसू देणार नाही-मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव
मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचा ठाणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. जाधव यांच्यावर राजकिय गुन्हे असून त्यांनी जनतेसाठी आंदोलन केले असल्याने न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर केला, अशी माहिती न्यायालयात जाधव यांची बाजू मांडणारे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी दिली. ज्या अधिकाऱ्याने माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले, त्या अधिकाऱ्याला स्वस्थ बसू देणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी जेलमधून सुटल्यावर दिली.
www.konkantoday.com