
चिपळूण शहर परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात- तुषार शिंदे
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात हजारो भाविक दाखल होतील. ग्रामीण भागातून खेर्डी, चिपळूण या बाजारपेठांमध्ये उत्सवाच्या खरेदीसाठीदेखील मोठी गर्दी होते. वाढती वाहने, पार्किंगची अपुरी व्यवस्था, बहादूरशेख नाका येथे सुरू असलेले काम यामुळे चिपळूण बहादूरशेख नाका खेर्डी या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी उपाययोजना करावी, अशी मागणी तुषार शिंदे यांनी केली आहे. ग्रामीण भागातील नागरिक व सणासाठी आलेल्या चारकमान्यांना त्यामुळे तासनतास ताटकळत रहावे लागते. हा पुर्वानुभव पाहता वाहतूक पोलीस व प्रशासनामार्फत गर्दीच्या ठिकाणी पोलीस कर्मचार्यांची नेमणूक करून वाहतूक व पार्किंगचे योग्य नियोजन करण्यात यावे, अशी मागणी खडपोली येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार शिंदे यांनी केली आहे. www.konkantoday.com