गोगटे महाविद्यालयात संस्कृतमधील गीत, नाट्य, स्तोत्रांनी कार्यक्रम रंगला


रत्नागिरी : संस्कृतमधील स्तोत्रे, गीते, नाट्य आणि नृत्य या माध्यमातून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात संस्कृत दिन समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून राजापूर हायस्कूलच्या संस्कृत शिक्षिका सौ. शोभा जाधव उपस्थित होत्या. संस्कृत दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात हा कार्यक्रम रंगला. याप्रसंगी संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी सौ. जाधव यांचे स्वागत केले. त्यानंतर अष्टलक्ष्मी स्तोत्र, दृष्टिकोनावर लघुनाटिका, नवग्रहस्तोत्र, कालभैरवाष्टक, अच्युताष्टक, समूहगीत, सादर झाले. तबलावादन, नमो नमो भारताम्बे नृत्य, कथाकथनाने कार्यक्रमाने रंगत वाढली. तसेच ऑगस्ट महिन्यातील घडामोडींवर आधारीत संस्कृत बातमीपत्र चांगले झाले. श्रीरामचंद्र कृपालु भज मन या गीतावरील नृत्य सुरेख झाले. तसेच तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी मंगळागौरीचे खेळ दाखवून सर्वांचे मनोरंजन केले. कार्यक्रमात ईशान खानोलकर, स्वरूप नेने, शंतनू सावंत, मेघा पेंडसे यांनी संगीतसाथ केली.

स्पर्धांचा निकाल असा– केतकी मुसळे (प्रश्नमंजूषा – प्रथम, संस्कृत संभाषण द्वितीय, अन्त्याक्षरी- तृतीय, गीतगायन तृतीय), कल्पजा जोगळेकर (अन्त्याक्षरी – प्रथम, गीतगायन- प्रथम (विभागून) पाठान्तर तृतीय), श्रावणी करंबेळकर (संस्कृत संभाषण – प्रथम, प्रश्नमञ्जूषा, कथाकथन – प्रथम), वरदा बोण्डाळे (अन्त्याक्षरी द्वितीय, पाठांतर द्वितीय, प्रश्नमंजूषा तृतीय), ओंकार खांडेकर (अन्त्याक्षरी प्रथम, संस्कृत संभाषण तृतीय), मनस्वी नाटेकर (कथाकथन – द्वितीय, प्रश्नमंजूषा तृतीय), श्रेया आठल्ये (अन्त्याक्षरी – तृतीय, कथाकथन तृतीय), दीप्ती गद्रे (गीतगायन – प्रथम (विभागून), पाठान्तर द्वितीय), चिन्मयी सरपोतदार (गीतगायन – द्वितीय, पाठान्तर द्वितीय), गिरिजा चितळे (संस्कृत संभाषण – प्रथम), सायली ताडे (संस्कृत संभाषण– द्वितीय), सिद्धी कोळेकर (संस्कृत संभाषण – तृतीय), पूर्वा खाडीलकर (अन्त्याक्षरी – प्रथम), मीरा काळे (अन्त्याक्षरी – द्वितीय), अथर्व सावरकर (अन्त्याक्षरी – द्वितीय), वैभवी निजसुरे (अन्त्याक्षरी – तृतीय), जान्हवी फडके (प्रश्नमंजूषा प्रथम), हर्षिता ढोके (प्रश्नमञ्जूषा प्रथम, पाठांतर द्वितीय), ऋग्वेद सरजोशी (प्रश्नमंजूषा द्वितीय), वेदश्री बापट (पाठान्तर द्वितीय, प्रश्नमंजूषा द्वितीय), सिद्धी ओगले (पाठान्तर प्रथम, प्रश्नमंजूषा– द्वितीय), दीप जोशी (प्रश्नमञ्जूषा – तृतीय), शमिका शिवलकर (पाठान्तर प्रथम), साक्षी शेवडे (पाठांतर तृतीय),
आर्या मुळे (पाठान्तर तृतीय).
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button