कोकण मार्गावर १४ रोजी ३ तासांचा मेगाब्लॉक


कोकण रेल्वे मार्गावरील मडगांव-कुमठा रेल्वे स्थानकादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी १४ सप्टेंबर रोजी ३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत घेण्यात येणार्‍या मेगाब्लॉकमुळे ३ रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या मेगाब्लॉकच्या पार्श्‍वभूमीवर ०९०५५७ क्रमांकाची उधना-मंगळूर स्पेशल १३ सप्टेंबर रोजी रत्नागिरी-मडगांव विभागादरम्यान १०५ मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे. ०६६०२ क्रमांकाची मंगळूर सेंटर-मडगांव विशेष गाडी १४ सप्टेंबर रोजी कुमठा स्थानकापर्यंत चालवली जाणार आहे. कुमठा ते मडगांवदरम्यान ही गाडी रद्द करण्यात येणार आहे. ०६६०१ क्रमांकाची मडगांव-मंगळूर विशेष गाडी १४ सप्टेंबर रोजी मडगांव ऐवजी कुमठा येथून मंगळूरला जाण्यासाठी सुटणार असून मडगांव ते कुमठादरम्यान ही गाडी रद्द करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button