अपात्रतेची नोटीस बजावलेल्या आमदारांपैकी काही आमदार शरद पवारांच्या संपर्कात?


नव्याने अपात्रतेची नोटीस काढलेल्या आमदारांबाबात एक मोठी बातमी समोर आली आहे. अपात्रतेची नोटीस बजावलेल्या आमदारांपैकी काही आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळतेय.अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत राष्ट्रवादीत बंड केलं. यावेळी त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांवर कारवाई करत अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली होतीनव्याने अपात्रतेची नोटीस काढलेल्या आमदारांपैकी काही आमदार पवारांच्या संपर्कात आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे अजित पवार गट अस्वस्थ असल्याचं देखील म्हटलं जातंय.
अपात्रतेची कारवाई असलेले संबंधित आमदार माघारी आल्यास त्यांच्या अपात्रते संदर्भात पुनर्विचार होणार आहे. मात्र मंत्री झालेल्या नऊ जणांविरोधात राष्ट्रवादीची कारवाई कायम राहणार आहे. आपली आमदारकी वाचवण्यासाठी काही आमदार पुन्हा पवारांच्या संपर्कात जाण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळालीय
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button