
रत्नागिरी शहरा जवळील परटवणे येथे मच्छी वाहतूक करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार
रत्नागिरी शहरातील परटवणे येथे मच्छी वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात तरुण दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात ट्रकचे चाकचं दुचाकी चालकाच्या अंगावरून गेले. या युवकाचे नाव अय्यान साखरकर असे आहे तो साखरतर येथील असल्याचे समजत असून तो रत्नागिरीहून साखरतरला जात असताना एम आय डी सी येथून भरधाव वेगाने आलेल्या मच्छीच्या ट्रकची जोरदार धडक दुचाकीला बसली.
या अपघातामुळे साखरतर येथील नागरिक आक्रमक झाले असून त्वरित कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते
www.konkantoday.com