येत्या सोमवारी कशेडी घाटातील एक बोगदा हलक्या वाहनांसाठी सुरू करण्यात येणार
कोकणातील मुंबई – गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला आता बोगद्यातील वाहतुकीचा पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे. येत्या सोमवारी (दि.११ सप्टेंबर) एक बोगदा हलक्या वाहनांसाठी सुरू करण्यात येणार आहे.खेड ते पोलादपूर कडे येणारा बोगद्यातीळ काम ९० टक्के पूर्णत्वास गेले आहे. तर उर्वरित काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सदरची मार्गिका खुली होणार असल्याने प्रवासी वर्गाचा घाटातील प्रवासाचा वनवास संपणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी सदरचा बोगदा गणपती पूर्वी खुला करण्याचे आदेश महामार्ग विभाग व संबधीत ठेकेदार यांना दिले होते
www.konkantoday.com