
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देवू नये -कुणबी सेनेची मागणी
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देवू नये व ओबीसीमध्ये सामावून घेवू नये, अशा मागणीचे निवेदन कुणबी सेनेच्यावतीने संगमेश्वर तहसीलदार यांच्याकडे शुक्रवारी सादर करण्यात आले.
कुणबी सेना गेली २३ वर्षे कुणबी समाजाला ओबीसीमधून स्वतंत्र आरक्षणाची मागणी करीत आहे. ओबीसीचे संरक्षण व्हावे, या मागणीसाठी आग्रही आहे. परंतु दोन दिवसांपूर्वी जालना येथील मराठा समाजावर लाठीचार्ज झाला, ही दुदैवी घटना आहे. तसेच मराठा समाजाला स्वतंत्र्य आरक्षण देण्याबाबत कुणबी व ओबीसीचा कोणत्याही प्रकारचा आक्षेप नाही. परंतु मराठा समाजाला कुणबी जातीचे
प्रमाणपत्र देणे हे चुकीचे असून त्यांना ते प्रमाणपत्र देण्यात येवू नये. मराठा समाज हा महाराष्ट्रातील प्रगत समाज असून आतापर्यंत सुमारे ९५ टक्के मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे
होवून गेले आहेत. कोकणातील हिंदु कुणबी व हिंदु तिल्लोरी कुणबी हा विषय समाजकल्याणमार्फत असूनही अंघातरी आहे
www.konkantoday.com