वेतोशी येथे चिरेखाणीत पडून प्रौढाचा मृत्यू.

रत्नागिरी तालुक्यातील वेतोशी येथे चिरेखाणीत पडून प्रौढाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. राजशेखर शरणप्पा बिरादर (५०, रा. सापुचेतळे, ता. लांजा) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद ग्रामीण पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. राजशेखर याला दारू पिण्याची सवय होती. ७ जून रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास येथील चिरेखाणीत पडलेल्या अवस्थेत आदळून आला. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करण्यात येत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button